गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये दलवाई हायस्कूलचे यश
ग्रामीण विभागात राज्यात प्रथम क्रमांक

(प्रतिनिधी-सुलभा जाधव मोहिते)गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी ने ग्रामीण विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र , रोख रक्कम रुपये ५१०००/- प्राप्त केले. हा पुरस्कार सोहळा जैन हिल्स वरील गांधी तीर्थांच्या कस्तुरबा सभागृहात रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सहसंस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन आदि मान्यवरांसह मुख्याध्यापक रोहित जाधव, समन्वयक संध्या बोराटे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष मते, सहाय्यक शिक्षिका स्वरा यादव आदि उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हुसेन भाई दलवाई, सल्लागार शमा दलवाई,चेअरमन खालिद दलवाई, व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.




