जिल्हास्तरीय शालेय शासकीय जिम्नास्टिक स्पर्धेत खेळाडूंचे सुयश
खदीजा इं.मिडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलचे यश यश

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय शासकीय जिम्नास्टिक स्पर्धा -2025-26 दिनांक 22 जुलै 2025 रोजी एस.व्ही. जे. सी. टी क्रीडा संकुल डेरवण येथे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सचिन मांडवकर यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेसाठी देवरुख, रत्नागिरी, खेड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यामधून बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत खदीजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुल – गोवळकोट विद्यालयातील खेळाडू कु. अली अब्दुल कादिर परकार याने 17 वर्षे मुलांमध्ये आर्टिस्टिक प्रकारात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच कु. जियाद आसिफ पटेल याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही विद्यार्थ्यांची शासकीय शालेय विभागीय जिम्नास्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रविण्यप्राप्त खेळाडूंना प्रशाळेचे क्रीडाशिक्षक विनोद राऊत , तसेच मुख्याध्यापक इरफान शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाचे गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. इसाक खतीब, व्हाईस चेअरमन जफर कटमाले , सेक्रेटरी मुजाईद मेयर, संस्थेच्या सिईओ उरुसा खतीब तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


