काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रफीक मोडक यांच्या वाढदिवसा निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप
मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न

सावर्डे : रत्नागिरी जिल्हा वक्ता सेल चे काँग्रेस अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री. रफिक मोडक सर यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्ताने सावर्डे येथील प्राथमिक उर्दू शाळा अडरेकर मोहल्ला तसेच प्राथमिक उर्दू शाळा पिंपळ मोहल्ला व तेथील बालवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या,पेन,पेन्सिल व बालवाडीच्या मुलांसाठी चार्ट अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच प्राथमिक उर्दू शाळा पिंपळ मोहल्ला या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील प्राथमिक शिक्षक श्री मुजाहिद मेहर यांना पुष्पगुच्छ, शाळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शौकत भाई माखजणकर, उपसरपंच जमीर मुल्लाजी, ट्रस्टीचे अध्यक्ष रफिक मुल्लाजी, शिराज भाई सय्यद ,मुराद खळपे,वसीम माद्रे ,लायक मोडक ग्रामपंचायत सदस्य समिया मोडक शाळेतील शिक्षक फातिमा कुपे,अजमीना पांगारकर, पठाण मॅडम ,मुजाहिद मेयर जनाब, अजमीना खलपे उपस्थित होते कार्यक्रमा शेवटी समिया मोडक यांनी सर्वांचे आभार मानले.




