
मुंबई :* अदानीची वीज घ्यायची, झोपु योजना त्यांची, त्यासाठी सरकाने भूखंड द्यायचे, ते पालिकेने स्वच्छ करायचे, इतर विकासकांनी अदानी कडून हस्तांतरणीय विकास हक्क घ्यायचा, अदानीला ‘झोपु’ योजनांमध्ये प्रिमीयम माफ ही मुंबईची सरळ-सरळ लूट आहे.
अदानी कंपनीने मुंबईत नियमानुसार व्यवसाय करावा पण, त्यांची दादागिरी मात्र आम्ही चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत सोमवारी दिला.
धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातला सर्वात मोठा भूखंड घोटाळा आहे.
धारावी पुनर्विकास केवळ घरांचा नाही. . धारावीत अनेक छोटे उद्योग आहेत. त्यांनी जायचे कुठे ? धारावीची ३०० एकर जमीन अदानीला दिलीच पण शेजारची २४० एकर जागाही दिली. धारावी प्रकल्पात अदानी कंपनीला मोठा टीडीआर मिळाला. तो इतर विकासकांना घेण्याची सक्ती केली जात आहे.
पुनर्विकासासाठी धारावीचा भूखंड देताना अदानी कंपनीला ७ हजार ५०० कोटींचा प्रिमीयम (भूखंड किमतीच्या २५ टक्के रक्कम) माफ करण्यात आला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.




