मुंबईतील प्रदेश कार्यालयात केक कापून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा
अनेक मंत्री व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित
मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील प्रदेश कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री मा .ना. श्री. नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदितीताई तटकरे, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष मा. श्री. सिद्धार्थ कांबळे, मुख्य प्रवक्ते मा.श्री. आनंद परांजपे, प्रवक्ते मा. श्री. संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. दिनकर तावडे, प्रदेश सरचिटणीस श्रीमती. सुरेखाताई पेडणेकर, उत्तर भारतीय सेलचे राज्य प्रमुख मा. श्री. पारसनाथ तिवारी, सह कोषाध्यक्ष मा. श्री. संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष मा. श्री. महेंद्र पानसरे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे विश्वस्त मा. श्री. सुदर्शन सांगळे, महिला कार्याध्यक्ष श्रीमती. आरतीताई साळवी, कुलाबा तालुकाध्यक्ष मा. श्री. किरण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




