राष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू दिपा मराठे २५ रोजी अंजनवेल विद्यालयात
स्वागताची जय्यत तयारी

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळंबकर)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या सौ.दिपा मराठे २५ रोजी गुहागर तालुक्यातील अंजनवेल विद्यालयात डॉ.तात्यासाहेब नातू स्मृतिदिन कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सौ.दिपा मराठे या एक प्रतिभावान भारतीय महिला क्रिकेट खेळाडू आहेत.त्यांनी १९९०च्यास दशकात भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून परिचित आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
कोकणचे लाडके नेते डॉ.तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी दिपा मराठे अंजनवेल येथील दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागीर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज मध्ये उपस्थित राहणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट खेळाडू या प्रथमच गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे येत असल्याने विद्यालयाच्या वतीने त्यांचे अतिभव्य असे स्वागत होणार आहे.सौ दिपा मराठे यांच्या स्वागतासाठी तिरंगी ध्वज लावून सलामी दिली जाणार आहे,तसेच झांज पथक,लेझिम पथक वाजवून भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.त्यानंतर दिपा मराठे यांची विशेष मुलाखत सहप्रवास प्रतिष्ठानचे विश्वस्त महेश आठल्ये घेणार आहेत.




