राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेर्डी उर्दू शाळेत छत्र्या वाटप
मुख्याध्यापिका रिजवाना चिलवान यांनी केले मान्यवरांचे स्वागत
चिपळूण-तालुक्यातील खेर्डी उर्दू शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने छत्री छत्री वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस तथा जमातुल मुस्लिमीन खेर्डीचे अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खेरटकर, ग्रामपंचायत सदस्या रशिदा चौगुले, ग्रामपंचायत सदस्य राजेश सुतार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तौफिक चौगुले,जमातुल मुस्लिमीन खेर्डीचे सहखजिनदार मुबारक चौगुले, कार्यकारिणी सदस्य सिद्दीक भेलेकर,आसिफ चौगुले, हसन खेरडकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा साजिदा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्याध्यापिका रिजवाना चिलवान यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या प्रति वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, उद्याचे सूज्ञ नागरिक बनावे असे आवाहन केले. आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




