महाराष्ट्र

श्री सुकाई देवी देवस्थान तळवली तर्फे भव्य सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेचे आयोजन

पारंपारिक परंपरा व ग्रामीण संस्कृती जपणारा आगळावेगळा उपक्रम

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
शेतीमधील पारंपरिक परंपरा जपणारा आणि ग्रामीण संस्कृतीचा अभिमान असलेला एक आगळावेगळा उपक्रम तळवली गावात पुन्हा एकदा रंगणार नांगरणी स्पर्धेचा थरार. श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवरस्थान तळवली यांच्या वतीने भव्य सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धा पर्व २ चे आयोजन रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा न राहता शेतकरी, बैलशौकीन व पारंपरिक बैलजोडींच्या संगतीचा सन्मान करणारा एक उत्सव ठरणार आहे. या स्पर्धेसाठी भव्य पटांगण श्री सुकाईदेवी मंदिर परिसर, तळवली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथे पार पडणाऱ्या या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील नामवंत बैलजोडी सहभागी होणार आहेत.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी ₹ १०,०००/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,तसेच व्दितीय क्रमांक ₹ ७,०००/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,आणि तृतीय क्रमांक ₹ ५,०००/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,तसेच चतुर्थ क्रमांक ₹ ३०००/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,आणि पंचम क्रमांक ₹ २०००/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,तसेच आजून नामांकन एकूण १० क्रमांकांसह दोन विशेष सुंदर जोडी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक विजेत्याला रोख रक्कम आणि मानाची ढाल प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ₹४००/- असून नावनोंदणीची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे.तरी स्पर्धेची नियमावली – १)पंचांचा निर्णय अंतिम राहील.२)जॅकी कितीपण जोड्या पळवू शकतो. ३)सदर स्पर्धा ही गावठी बैल जोडीसाठी आहे. आणि इतर ४)नियम कमिटीकडे राखीव असतील याची नोंदघ्यावी.आणि केवळ गावठी बैलजोड्याच स्पर्धेसाठी पात्र असतील. ही नांगरणी स्पर्धा म्हणजे पारंपरिक कृषी पद्धतीला मिळणारा नवा उजाळा आणि गावागावांतील बैलशौकिनांसाठी एक मोठा व्यासपीठ आहे.
तसेच ग्रामस्थ आणि आयोजक प्रेक्षकांनी, शेतकरी बांधव व बैलप्रेमींना ही स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच अधिक माहिती आणि नोंदणीसाठी श्री प्रदीप चव्हाण मो.७७४४०८०३७६ , श्री गणपत शिगवण मो. ७०५६८८२२२५ , आणि कु अभिषेक सांगळे मो.७०८३७२५६२० यांच्याकडे करावे. ही भव्य सामूहिक पारंपरिक गावठी बैल नांगरणी स्पर्धा म्हणजे गावाची ओळख, बैलांचा सन्मान आणि संस्कृतीचा वारसा एकत्र टिकवणारा ठरणार आहे. आपण अनेकांनी सहभाग घेऊन बहुसंख्येने उपस्थित रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!