खेल
असगणी गावचा सुपुत्र सुबोध मायनाक याची ऑल इंडिया टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड
माजी मनसे तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांनी केले अभिनंदन

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असगणी गावचा सुपुत्र कुमार सुबोध संदीप मायनाक याची सोलापूर अकलूज येथे घेण्यात आलेल्या 7 वी अजिंक्यपद स्पर्धेत निवड.मथुरा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या ऑल इंडिया टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 -2026 मध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.गरीब परिस्थिती असताना खूप मेहनत घेतली आणि अथक परिश्रम त्याने घेतले.त्याच्या मेहनतीला यश मिळाले.त्याने तालुक्याचे तसेच असगणी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.खेड तालुका मनसेच्या वतीने आणि असगणी गावाच्या तसेच माजी खेड तालुका अध्यक्ष मनसे संदीप हरी फडकले साहेब यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले.


