कळवणे येथील दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू
यश च्या जाण्याने कबड्डी क्षेत्रातील हिरा गमावला
दसपटी(चिपळूण) (डाॅ सुनिल सावंत)तालुक्यातील दसपटी येथील चिपळूण-नांदिवसे रस्त्यावरील गाणे (राजवाडा) येथे बुधवार दि. २३ जुलै रोजी दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक झाली होती. या भीषण अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता.
सदरच्या अपघातातील यश सूर्यकांत घडशी (वय २० वर्षे, रा कळकवणे व संदीप शांताराम जाधव वय २५ वर्षे, रा. ओवळी) या दोघांना डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान यश सूर्यकांत घडशी याची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान त्याच्या उपचारासाठी कळकवण्यातील ग्रामस्थ व अॅड. अमित कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.या तरुण कबड्डी खेळाडूच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण दसपटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचा अंतिमविधी राहत्यागावी कळकवणे येथे काल दुपारी पार पडला. शांत व मनमिळावू स्वभावाच्या यशचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, खडपोली ओद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्याच्या पश्चात आई,भाऊ, काका काकी,आजी असा परिवार आहे. अपघातामुळे दुचाकी स्वरांचे वेगावरील नियंत्रण व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




