महाराष्ट्र
रत्नागिरी पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
शासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

रत्नागिरी : आज भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी पोलिस परेड ग्राउंडवर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात वीरांना कृतज्ञतेने अभिवादन केले व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस दल, होमगार्ड आणि इतर तुकड्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण परेडने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
- या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, विद्यार्थी आणि रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




