खेल
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण तृतीय क्रमांक
मुख्याध्यापक इम्तियाज इनामदार यांनी केले खेळाडूंचे व प्रशिक्षक शमा मणेर यांचे अभिनंदन

चिपळूण -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण च्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केले. सदरच्या संघाला क्रीडा शिक्षिका सौ शमा मणेर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक इम्तियाज इनामदार यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षिका शमा मणेर यांचे अभिनंदन केले.


