……. अन्यथा मला रेल्वे डब्यांचे दरवाजे उघडावे लागतील-शौकतभाई मुकादम
चिपळूण आतील प्रवाशांचे होत आहेत हाल : चौकशीची मागणी

चिपळूण:दिवसेंदिवस रेल्वे
प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे.मुंबईकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या रेल्वे। गाड्यांचे रेल्वेच्या डब्याचे दरवाजे आतून लॉक केले जातात त्यामुळे चिपळूणमध्ये आरक्षणची तिकीट असणाऱ्या प्रवाशांना सुद्धा आतमध्ये बसता येत नाही. त्यामुळे आरक्षित केलेल्या लोकांचे पैसे नाहक फुकट जात आहेत.याची चौकशी व्हावी व रेल्वे डब्याचे दरवाजे आतून बंद करणाऱ्यावर रेल्वे आर.पी.एफ पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केले आहे.या संदर्भात कार्यवाही न झाल्यास आम्हाला रेल्वे डब्यांचे दरवाजे उघडावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.श्री. शौकतभाई मुकादम पुढे म्हणाले की, दि. ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ३.२० वा.मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस हे चिपळूण रेल्वे स्थानकावर आली असता, त्या गाडीचे दरवाजे आतून बंद करण्यात आले होते.यामुळे आरक्षण केलेले सर्व प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावरच राहिले. असे असताना प्रवाशांनी ही घटना आरपीएफ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु आरपीएफ पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.असे प्रकार वारंवार घडत आहेत. मग आर.पी.एफ पोलीस झोपा काढत आहेत का? प्रवाशांच्या तक्रारी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीकडे आल्या आहेत.त्यामुळे समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला याविषयी कळविले आहे.दि. ३ सप्टेंबर रोजी मांडवी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली. तिचे दरवाजे आतून बंद केल्या असल्यामुळे चिपळूण येथील प्रवासी श्री. प्रभाकर सैतवडेकर यांच्यासह अनेक प्रवासी आरक्षण असून सुद्धा लहान मुलांसोबत चिपळूण रेल्वे स्टेशनवरच राहिले. रेल्वे डब्याचे दरवाजे आतून लॉक करणे हे कायद्याने गुन्हा आहे. यापुढे रेल्वे प्रशासने याकडे त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.




