महाराष्ट्र
डीबीजे ची राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट अनुष्का रोकडे चे जोरदार स्वागत
दिल्ली येथील 'थल सैनिक कॅम्प' यशस्वीरित्या केला पूर्ण

-
चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना विभागाची कॅडेट अनुष्का ज्ञानेश्वर रोकडे हिचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनुष्का रोकडे हिने अत्यंत प्रतिष्ठेचा ” थल सैनिक कँप ‘ पूर्ण करून आज ती चिपळूण मध्ये दाखल झाली. आज तिचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.संस्थेचे चेअरमन श्री. मंगेश तांबे यांनी तिचा सन्मान केला. यावेळी नियामक समिती सदस्य,संचालक ,प्राचार्य श्री.माधव बापट व अनुष्काचे आई – वडील उपस्थित होते.
‘थल सैनिक कॅंप’ हा राष्ट्रीय छात्र सेना विभागात महत्त्वाचा व मानाचा मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ४० कॅडेट ची निवड करण्यात आली. यानंतर कोल्हापूर विभागातून १० तर महाराष्ट्र बटालियन कराड मधून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संपूर्ण कोकण विभागातून दोन कॅडेटची निवड करण्यात आली. यामध्ये अनुष्का रोकडे होती. हा थल सैनिक कॅम्प दिल्ली येथे संपन्न झाला. तो यशस्वीरित्या पूर्ण करून नुकतेच तिचे चिपळूण मध्ये आगमन झाले. प्राचार्य डॉ माधव बापट, मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने यांनी तिचे स्वागत केले . महाविद्यालयात मिरवणूक काढून तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तिचा व तिच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चेअरमन श्री मंगेश तांबे, व्हा.चेअरमन डॉ. दिपक निखारे,सचिव श्री. अतुल चितळे, श्री. अविनाश जोशी, सावित्रीताई होमकळस, फैसल कास्कर, निलेश भुरण, प्राचार्य डॉ माधव बापट, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने, प्राध्यापक श्री. नलावडे आदी उपस्थित होते. जोरदार स्वागत




