खेल

जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत दापोलीच्या फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मीडियम स्कूलचा मूसा खान द्वितीय

अभिनंदनाचा वर्षाव : विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार

क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा खेळाडू कु. मुसा शमशाद खान याने आपल्या अफलातून कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंमध्ये मुसाने आपल्या कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

आता तो दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2025 रोजी रोडरेस महासैनिक दरबार हॉल, करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत** रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. इक्बाल परकार सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशरफ आंजर्लेकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष व माध्यमिक विभाग शाळा समिती चेअरमन श्री मुजीब रुमाने, प्राथमिक विभाग शाळा समिती चेअरमन श्रीमती मीनाज आंजर्लेकर संस्थेचे सीईओ श्री. यासीर परकार सर, क्रीडा मार्गदर्शक श्री. नाईकवाडी सर व श्री. वकार अफवारे, तसेच पालक श्री. शमशाद खान यांनी मुसाचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

शाळेच्या इतिहासात ही एक उल्लेखनीय कामगिरी ठरत असून, मुसाने दापोलीचे नाव जिल्हास्तरावर गौरवाने झळकवले आहे. त्याच्या जिद्दीला, मेहनतीला आणि क्रीडा आत्म्याला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!