लोकल न्यूज़
ज्येष्ठ नागरिक संघ चिपळूणची सर्वसाधारण सभा संपन्न
अध्यक्ष उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न

-
रविवार दि.२८-९-२०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणची वार्षिक सर्वसाधारण सभा सावरकर सभागृहात (आदर्श डायनिंगच्या वर,नगरपालिके समोर)संघाचे अध्यक्ष श्री उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.यावेळी मंचावर उपाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव रत्नमाला कळंबटे आणि कोषाध्यक्ष विजय बापट उपस्थित होते.श्री गणेश आणि देवीची प्रार्थना करून सभेला सुरुवात झाली.
सुरुवातीला दिवंगत सभासदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर अध्यक्ष श्री बांगी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.नंतर रत्नमाला कळंबटे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले.अहवाल वाचन विजय बापट यांनी केले.यावेळी झालेल्या चर्चेत अनिल केतकर,राजेंद्र जाधव,किशोर जाधव,जगन्नाथ मोरे,प्रकाश सावर्डेकर,चंद्रकांत खरे,विजयालक्ष्मी भोसले यांनी भाग घेतला.त्यानंतर नवीन कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेचे काम पाहणारे निवडणूक अधिकारी श्री.दिलीप पाटील,श्री.केशव शिंदे आणि श्री.प्रभाकर बुटाला यांना मंचावर पाचाारण करण्यात येऊन त्यांचे श्री. बांगी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.दिलीप पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.नंतर आपले मनोगत व्यक्त करताना किशोर कदम यांनी संघाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढून नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.सिद्धोजीराव जाधव यांनी ऑरेंज कार्ड आणि आभा कार्डा बाबत आपली सूचना मांडली. डॉ.रत्नाकर थत्ते यांनी पोस्टात ठेवी ठेवणे जास्त सुरक्षित आहे असे सांगितले.
सभेला एकूण १३० सभासद उपस्थित होते.रत्नमाला कळंबटे यांनी आभारप्रदर्शन केल्यानंतर सौ.नीला पेंडसे यांनी पसायदान म्हटले आणि सभेची सांगता करण्यात आली.नंतर सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.सूत्र संचालन सौ.नीला पेंडसे यांनी केले.



