कडवई च्या महाराष्ट्र उर्दू हायस्कूल चे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश
कोकण सिरत कमिटी आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थी चमकले
- प्रतिनिधी-शाहिद अहमद तुळवे
चिपळूण येथील कोकण सिरत कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय न्आत व वकृत्व स्पर्धा मध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवईच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उजळले. या स्पर्धेत न्आत स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
न्आत स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी फाईजा अन्सारी , नजीफा बागलकोटे, शर्लीज तुळवे, शेहरीश शेख, रिदा हफसानी, फातीमा अन्सारी, खदीजा टेमकर, जोहा फणसोपकर, जोहा भाटकर, आणी अरशीन खतीब यांनी उत्तम न्आत सादर करून निर्णायक मंडळाची मने जिंकली. विशेषतः, इयत्ता सहावीच्या रिदा हफसानी हिने पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या मक्की आयुष्यावर आपले विचार प्रभावीपणे मांडले आणि वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
शाळेचे प्रिन्सिपल रिजवान कारीगर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्गिस तुळवे आणि नुजहत बागलकोटे यांनी सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शन व परिश्रमामुळे व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी साध्य केली.
संस्थेचे अध्यक्ष सादीक काजी आणि उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे यांसह सर्व सदस्यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जमातुल मुस्लीमीन कडवईचे अध्यक्ष सिकंदर जुवळे आणि सदस्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकवृंद जावेद दखणी, तौफिक शेख, रिदवान काद्री, इम्रान कापडे, सुमय्या खान, साक्षी खांबे तसेच शिक्षकेतर कर्मचारी नदीम मस्तान, दस्तगीर मुल्लाणी आणी प्रशांत कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कार कार्यक्रमांचा गौरव वाढला असून, भविष्यातही विद्यार्थ्यांनी असेच उज्वल कामगिरी करत राहण्याची प्रेरणा मिळाली आहे.




