कोकण सिरत कमिटी व चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेल्फेअर तर्फे हिंदू भगिनींना मेहंदी लावण्याचा कार्यक्रम
राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक एकता वाढविण्याचा उद्देश

🌹🌳 *विनम्र आवाहन *🌹🌳
*कोकण सिरत कमिटी चिपळूण व चिपळूण मुस्लिम वूमन अँड चाईल्ड वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक एकता वाढावी या उद्देशाने दीपावलीच्या मुहूर्तावर रविवार दिनांक 19 ऑकटोबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आपल्या हिंदू भगिनींना मेहेंदी लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.*
*भारत देशाचे वैशिष्ट्ये म्हणजे विविधतेतून एकता व एकते मध्ये विविधता, सध्याची परिस्थिती पाहता या एकतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालू आहे धार्मिक द्वेष पसरविणे व कटुता निर्माण करण्याचे काम चालू आहे जे राष्ट्राला धोकादायक आहे. चिपळूण मधील सामाजिक एकता ही चांगल्या पद्धतीने टिकून आहे. तरी सुद्धा येथेही ठरविक लोक प्रयत्न करीत आहेत.*
*संपूर्ण देशाची एकता कायम टिकविणे हे खऱ्या देशप्रेमाचे प्रतीक आहे याच हेतूने कोकण सिरत कमिटी व चिपळूण मुस्लिम वूमन अँड चाईल्ड वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या भगिनींना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मेहेंदी लावली जाणार आहे. ज्या भगिनी आपल्या हाताला मेहंदी लावू इच्छितात त्यांनी कार्यक्रमात सुसूत्रता यावी या करीता आपली नावे अध्यक्ष रिहाना बिजले 9421186023, नसरीन खडस 9890241761 यांचे कडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे*



