150
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार

*चिपळूण :* चिपळूण क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित तालुकास्तरीय १६ वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा १० ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान रंगणार आहे. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन गेली ३ वर्षे ही स्पर्धा नियमितपणे आयोजित करत आहे. मागील वर्षी एकूण ८ संघांनी सहभाग नोंदवला होता. ती स्पर्धा साखळी पद्धतीने पार पडली होती. त्या वेळी गोविंदराव निकम माध्यमिक शाळा, सावर्डे यांनी विजेतेपद पटकावले होते.
यावर्षी स्पर्धेला अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्याने एकूण १४ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा नॉकआउट पद्धतीत आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक सामना २० षटकांचा असणार आहे.
ही स्पर्धा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दशरथशेठ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता चिपळूण–संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
- क्रिकेटप्रेमी नागरिकांनी व चिपळूणवासीयांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




