महाराष्ट्र

मोहन विद्यालय आकले चे मुख्याध्यापक संजू वाघमारे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

दसपटी विभाग राम वरदायिनी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

दसपटी (डाॅ. सुनील सावंत): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित  ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ दसपटी विभाग रामवरदायीनी शिक्षण संस्था संचलित ‘मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आकले’ तालुका चिपळूण या संस्थेचे मुख्याध्यापक श्री. संजू रामचंद्र वाघमारे यांना नुकताच कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर येथील ‘मुख्याध्यापक महामंडळाच्या’ राज्यस्तरीय अधिवेशनात २६ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. याचे औचित्य साधून दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेने श्री.बळीरामदादा  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कारसोहळा आयोजित केला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. बळीरामदादा यांनी आपल्या मनोगतात वाघमारे सर यांच्याबद्दल बोलताना सांगितले की शिक्षण क्षेत्रातील त्यांची अपार निष्ठा, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य हे वाखाणण्याजोगे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, शिक्षक वर्गातील समन्वय आणि शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केवळ शाळेचा शैक्षणिक दर्जाच उंचावला नाही तर विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करून समाजाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

त्यानिमित्ताने आकले विद्यालयातील विद्यार्थी कु. करण उमेश जाधव व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका सौ. मनस्वी अमित जोशी यांची राज्यस्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनासाठी तसेच कु.आदित्य प्रदीप जाधव याची राज्यस्तरीय चालण्याच्या स्पर्धेसाठी व सम्राट जगदीश गमरे यांची कुमार गट महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यांचादेखील सन्मान सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नरसिंगराव शिंदे, खजिनदार कौस्तुभशेठ जागुष्टे, हिशोबतपासणीस विजयशेठ टाकळे, संचालक रामचंद्र राऊत, विश्वास शिंदे, तिवरे मुख्याध्यापक श्री.जोशी सर,ओवळी नांदिवसे हायस्कुलचे मुख्याध्यापक आरेकर सर, पोलिस निरीक्षक श्री.सुरेशराव शिंदे व प्रदीपराव शिंदे, विद्यालयातील सर्व कमिटींचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी सौ. वाघमारे यांचा देखील सन्मान करण्यात आला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वनवे सर यांनी केले.

दसपटी विभाग रामवरदायीनी शिक्षण संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री. संजू वाघमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार करताना दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेने श्री.बळीरामदादा शिंदे, सोबत विजय शेठ टाकळे, नरसिंगराव शिंदे आदी मान्यवर ( छाया: डॉ. सुनील सावंत, कादवड )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!