महाराष्ट्र

अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासभा व संलग्न उ बाराबलुतेदार कारागीर वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभाग अध्यक्षपदी चंद्रकांत खोपडकर

अभिनंदनचा वर्षाव

चिपळूण : अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासभा व सलंग्न विश्वकर्मा बाराबलुतेदार कारागीर वेल्फेयर फांऊडेशन महाराष्ट्र राज्यच्या कोकण -विभाग अध्यक्ष या पदावर चंद्रकांत सदाशिव खोपडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रकांत खोपडकर हे चिपळूण तालुका विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष असून लोक कल्याण ग्राहक संरक्षक संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्य आहेत. हस्त रेषा पाहणे तसेच भू गर्भातील पाणी ते नारळ, क्वाईन व अत्याधुनिक मशीनद्वारे पाहत असल्याने त्यांचा समाजात बोलबाला आहे. त्यांच्या या पद प्रतिष्ठेमुळे विश्वकर्मा समाज, बाराबलुतेदार समाजाला एकजुटीची मजबूती प्रदान होईल, आणि विश्वकर्मा समाज बलुतेदार समुह सर्वांगीण विकासाच्या प्रगतीकडे वाटचाल करेल या अपेक्षेने त्यांना हे पदं देण्यात आले आहे.

  • आपल्या कडून अपेक्षा आहे की शहरातील, जिल्हा, तालुक्यातून २५, २५ चांगले प्रतिष्ठीत व सक्रीय कार्यकर्त्यांना जोडते वेळी प्रथम लोहार, सुतार, सोनार, कासार, बेलदार, कुंभार, शिंपी, कोष्टी, नाव्ही, धोबी, बुरड, पिंजारी आपल्या सह या विश्वकर्मा समाजाची भागेदारी सुनिश्चितीत असावी, तेव्हाच महाराष्ट्र राज्याला मजबूती मिळेल अशी अपेक्षा खोपडकर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. चंद्रकांत खोपडकर यांच्या निवडीबद्दल सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!