नुकत्याच महाबळेश्वर येथे, सह्याद्री क्लासिक सायकलींग क्लबने, भरवण्यात आलेल्या, दोन घाट पुरुष खुला गट स्पर्धेत, चिपळूणच्या अथर्व ने, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत, तिसरा क्रमांक पटकावत, दैदीप्यमान यश प्राप्त केले. तसेच मुंबई सायकलोथाॅन स्पर्धेत, चौथा क्रमांक पटकावला. केवळ २ सेकंदाच्या फरकाने, ३ नंबर पासून तो दूर होता.
वडील हेमंत यशवंत भोसले यांच्या, व्यावसायिक सायकल स्पर्धेतील अनुभव/मार्गदर्शन व ८० वर्षीय आजोबा, यशवंत पांडुरंग भोसले यांचा, सायकल चालवण्याचा वारसा जपत, तो, या यशाला गवसणी घालत आहे. नजिकच्या भविष्यात, या सायकल चालवण्याच्या क्षेत्रात, येथील चिपळूण सायकलींग क्लबच्या मार्गदर्शनाखाली, चिपळूणचेच नव्हे तर, रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन करेल, अशी खात्री, येथील सायकलींग क्षेत्रातील दिग्गजांना वाटते.
या, महाबळेश्वर येथे आयोजित, सह्याद्री क्लासिक सायकलींग स्पर्धेत चिपळूण सायकलींग क्लबने मोठ्या संख्येने, सहभाग नोंदवला व तितक्याच मोठ्या प्रमाणात यश नोंदवून, संपुर्ण स्पर्धेवर आपला दबदबा निर्माण केला.
ज्या वयात मुले, हातात महागडे मोबाईल घेऊन, त्याच्या आहारी जातांना आपण, आजुबाजूला सर्वत्र पहात आहोत. त्या काळात याने, महागड्या सायकलचे हँडल हातात घेतले आहे. ” याच क्षेत्रात नव्हे तर, ज्या-त्या पाल्याच्या आवडीनुसार, पालकांनी आपल्या, या वयोगटातील पाल्यांना मार्गदर्शन करावे व लोप पावत चाललेल्या, मैदानी खेळाकडे त्यांना आकृष्ट करावे. तसेच कुठल्याही क्षेत्रात, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण करावयाचे असल्यास, होतकरू खेळाडूंना, शासनाने सरकारी स्तरावर, मार्गदर्शन तसेच अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे. अन्यथा, अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागवण्यात, नैसर्गिक कौशल्य (talent) वाया जाते.” असे विचार अथर्वचे वडील हेमंत भोसले यांनी, अथर्व ने मिळवलेल्या यशाप्रसंगी व्यक्त केले.
या, यशप्राप्ती मधे, चिपळूण सायकलिंग क्लब चा, मोलाचा वाटा आहे. असे अथर्व मानतो.