जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिस्त्री हायस्कूलचे दैदिप्यमान यश
अपंग गटातील माध्यमिक मॉडेल स्पर्धेत प्रथम क्रमांक

*रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूल ने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अपंग गटातील माध्यमिक विभागाच्या मॉडेल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.*
*कुमारी मुनीबा मुकद्दर बारगीर आणि कुमारी अर्फिन रियाकत बारगीर यांनी “स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल” हे मॉडेल सादर करून देवरुख येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि सुर्जन ऍक्टिव्हिटी सेंटर फॉर सायन्स येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले. त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय ज्ञान प्रदर्शनासाठी त्यांची निवड झाली आहे.*
*या विद्यार्थिनींना इम्तियाज सिद्दिकी, निशात राजवाडकर, फरहत मिरकर, इकबाल मुजावर, हुजेफा मुकादम या शिक्षकांनी तसेच प्रयोगशाळा सहाय्यक इम्तियाज काझी यांचे मार्गदर्शन लाभले.*
*या विज्ञान प्रदर्शनात शिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांनी प्राथमिक विभागातील शैक्षणिक साधने या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.*




