मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास आज माझ्या राजकारणाचा पाया-आ.शेखर निकम
सायले गवळीवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास हाच माझ्या राजकारणाचा पाया आहे. गावाचा प्रश्न तोच माझा प्रश्न आहे, आणि तो सोडवताना कोणत्या पक्षाचा आहे हे मी कधीही पाहिले नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि प्रामाणिक ग्रामस्थांना सोबत घेऊनच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील सायले गवळीवाडीतील ग्रामस्थांचा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
आमदार शेखर निकम यांनी आजवर पक्षभेद न करता रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी विविध विकास कामे सातत्याने
मार्गी लावली आहेत. नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू या भूमिकेतून त्यांनी तालुक्यातील अनेक रखडलेली कामे पूर्णत्वास नेली असून, त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला मिळत आहे.
येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व पक्षविरहीत विकास कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) अधिकृत
प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला विश्वास असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. यावेळी विनोद भालेकर, सुनिल भालेकर, गणपत महाडीक, राजाराम भालेकर, सखाराम भालेकर, सुरेश भालेकर, संतोष भालेकर, संदिप भालेकर, विकास भालेकर, नितीन भालेकर, तुकाराम भालेकर, गणपत भालेकर, अनिल भालेकर,
यशवंत भालेकर तसेच पांडूरंग कांबळे आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशप्रसंगी संकेत खामकर, दीपक कदम, अमोल चव्हाण, उदय कांबळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून, आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर वाढता जनविश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.




