महाराष्ट्र
शिवकृपा मंडळ कळंबस्ते आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ
महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

कळंबस्ते : शिवकृपा मंडळ, कळंबस्ते यांच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा मा. सौ. चित्राताई चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी माजी सरपंच सचिनदादा शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रेनुका गंजेकर, रमेश गंजेकर, रघू सर्वे, आशिर्वाद घाग अक्षय गंजेकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




