कृषी प्रदर्शनाचा आज सकाळी ११.३० वाजता चिपळूणात उदघाटन सोहळा
मंत्री गण व मान्यवरांची उपस्थिती

*आज चिपळूण मध्ये वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सवाचा उदघाटन सोहळा*
चिपळूण – आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता बहादूरशेख येथील सावरकर मैदानात कृषी महोत्सव २०२६ चे उदघाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, दुग्धविकास मंत्री ना.अतुल सावे, मत्स्य व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री ना. भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, माजी आमदार विनय नातू व चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदी मान्यवरही या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष, चिपळूण नागरी पतपेढी, मुख्य प्रवर्तक, आशिष ची मिल्क प्रॉडक्ट्स व मुख्य कार्यकारी अधिकारी चिपळूण नागरी पतपेढी स्वप्ना यादव, तसेच वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन व भाजप नेते प्रशांत यादव यांनी केले आहे.




