लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांचा दिवाळी अंक ‘सिंदूर’ मराठबोली पुणे आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित
'सिंदूर' हा दिवाळी अंक २०२६ मध्ये सलग दुसऱ्यांदा पुरस्कारास पात्र

*पुणे प्रतिनिधी*
लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या ‘सिंदूर’ या दिवाळी अंकाला मराठबोली,पुणे या संस्थेकडून द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळकृष्ण कासार यांच्या दिवाळी अंकाला २०२६ मधील सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे धनकवडी येथील शिक्षण संस्थेच्या कार्यालयात मराठीबोली पुणे या संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भापकर, कार्याध्यक्ष साहेबराव पवळे, संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यापूर्वी नुकताच मुंबई येथे पत्रकार दिनी महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. आता मराठबोली, पुणे या संस्थेकडुन मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा दुसरा पुरस्कार मिळाला आहे.
मराठमोळी, पुणे ही संस्था शैक्षणिक, साहित्यीक आणि सामाजिक विषयांवर गेली २५ वर्ष काम करत असून लेखक, कवी, साहित्यिक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. तर दिवाळी अंकाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करत असते. यावर्षी राज्यातील सर्वाधिक ३५७ दिवाळी अंकाच्या संपादकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अंकाचे परिक्षण करण्यासाठी तज्ञ साहित्यिकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातून ३५ अंक निवडले गेले. या ३५ अंकाचे तिसऱ्या फेरीतील परिक्षक यांनी तीन दिवाळी अंकांची निवड करण्यात आली. यातून द्वितीय क्रमांकाचा नंबर लोकनिर्माण च्या सिंदूर या दिवाळी अंकाने पटकावला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भापकर, कार्याध्यक्ष साहेबराव पवळे, संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड पुणे येथील लोकनिर्माण वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी विनायक दोरगे, तालुका प्रतिनिधी सौ. सुरेखाताई भोसले, शहर प्रतिनिधी संदीप काळे, धनकवडी प्रतिनिधी प्रा. बोराटे सर, बागवान मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




