नवदुर्गा मंडळ धामणदेवी सहाणवाडी तर्फे ज्ञानेश्वरी पारायण व सत्यनारायण महापूजा निमित्ताने भाजप नेते वैभव खेडेकर यांचा सत्कार
नवनिर्वाचित नगरसेविका वैभव खेडेकर यांचाही सत्कार
*नवदुर्गा मंडळ धामणदेवी सहाणवाडी.*
*ज्ञानेश्वरी पारायण व श्री सत्यनारायण महापूजा आणि कीर्तन महोत्सव सोहळा.*
*नवदुर्गा मंडळ धामणदेवी,सहाणवाडी यांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण व श्री सत्यनारायण महापूजा आणि भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर किर्तन सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प आकाश महाराज गरगडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.*
*सदर किर्तन सोहळ्याला भाजप नेते तथा मा. नगराध्यक्ष . श्री. वैभवजी खेडेकर व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैभवी वहिनी वैभव खेडेकर यांनी उपस्थिती लावत कीर्तन सोहळ्याचा आनंद घेतला.*
*यावेळी समस्त धामणदेवी सहाणवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने वैभवजी खेडेकर व वैभवी वहिनी खेडेकर यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी वैभवजी खेडेकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या.*
*यावेळी मंडळाचे श्री.अमोल राऊत, श्री प्रशांत राऊत, श्री. अविनाश बहुतुले , सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह मंडळाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*📍 धामणदेवी , सहाणवाडी , खेड 🗓️२० जानेवारी २०२६*




