महाराष्ट्र

वाशिष्ठी कृषी महोत्सवात पत्रकार दिनी प्रशांत यादव यांनी केला पत्रकारांचा सन्मान

ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, समीर जाधव, निसार शेख यांनी केली मनोगतात कृतज्ञता व्यक्त


*चिपळूण :* वाशिष्टी कृषी व पशुधन प्रदर्शनात मंगळवारी दुसऱ्या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. वाशिष्टीचे चेअरमन प्रशांतजी यादव व मुख्यप्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही वशिष्टी डेअरी च्यावतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील घडामोडी, प्रश्न आणि वास्तव निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे चेअरमन प्रशांत यादव यांनी सांगून सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन आपल्या स्वतःसाठी काही केले पाहिजे. आमच्यासारखे लोक आपणास मदत करतील त्या दृष्टीने विचार व्हावा असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, समीर जाधव, निसार शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास पत्रकार जमालुद्दीन बंदरकर, सतीश कदम,सुभाष कदम,राजेश कांबळे, संदीप बांद्रे, राजेंद्र शिंदे, राजेश जाधव, नागेश पाटील, सुशांत कांबळे, शैलेश जाधव, शैलेश कदम, गौरव तांबे, संतोष सावर्डेकर, महेंद्र कासेकर, संतोष पिलके, संतोष कुळे, ,सुनील दाभोळे, समीर जाधव, राजेंद्र कुमार शिंदे, मकरंद भागवत, इकलाक खान, गुलजार गोलंदाज, बाळू कोकाटे, स्वप्नील घाग, राजेश तु. जाधव, स्वाती हडकर, कृष्णकांत उर्फ बबन साळगावकर , नंदकुमार चिटणीस, शकील तांबे, मिलिंद सकपाळ, निसार शेख, संजय सुर्वे, दीपक शिंदे, सुरेश पवार, अनिल फाळके, ओंकार रेळेकर, हेमंत चव्हाण आदी अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!