महाराष्ट्र

डॉ.यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन च्या आपत्ती व्यवस्थापन समिती च्या राज्य चेअरमन पदी नियुक्ती

IMA राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केली नियुक्ती जाहीर

चिपळूण चे सुपुत्र सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य च्या आपत्ती व्यवस्थापन समिती(Disaster Management कमिटी) या महत्त्वपूर्ण समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड

चिपळूणचे ख्यातनाम त्वचा व सौंदर्यविकार चिकित्सक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण समितीच्या राज्य चेअरमनपदी अत्यंत गौरवशाली अशी निवड झाली आहे.

IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. ही समिती महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी तसेच आपत्तीच्या काळात प्रभावी सेवा देण्यासाठी कार्य करणार आहे.
समितीच्या कार्यक्षेत्राबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

डॉ.यतीन जाधव हे कोकणातील सुप्रसिद्ध स्प्रिंग क्लिनिकचे संचालक आणि अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत आहेत.
याशिवाय त्यांनी जिल्ह्यातील अनेक नामवंत औद्योगिक आस्थापनांमध्ये औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
औद्योगिक स्वास्थ्य क्षेत्रातील उत्तम जाणकार व प्रभावी आपत्ती व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे.
औद्योगिक स्वास्थ्य व आपत्ती व्यवस्थापन यामधील या भरीव कामगिरीबरोबरच त्यांनी आय एम ए (महाराष्ट्र राज्य) च्या औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्षपद व समन्वयक पद यापूर्वीच यशस्वीरित्या भूषविलेले आहे.
ते इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष व कोरोना टास्क फोर्स चे कोकण विभाग समन्वयक देखील राहिलेले आहेत.

डॉ. यतीन जाधव यांची सामाजिक व सांस्कृतिक कारकीर्द देखील तेवढीच उल्लेखनीय राहिलेली आहे.
कोकणच्या साहित्य व सांस्कृतिक इतिहासाचा मानदंड असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
सांज सोबत, एकता विकास मंच,आपलं चिपळूण, टच या सामाजिक संस्थांचे ते अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कोकण कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून देखील त्यानी मोलाचे योगदान दिलेले आहे.
वैद्यकीय व इतर क्षेत्रातील त्यांचे विचार प्रवर्तक लेख विविध शास्त्रीय व इतर नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.

  • चिपळूण तालुका खो खो असोसिएशन व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य चिपळूण शाखेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.

    अनेक सामाजिक व आरोग्यविषयक प्रबोधन उपक्रम राबविण्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे.

    इंडिअन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सर्वात नामवंत व सर्वात मोठ्या संस्थेने चिपळूण सारख्या छोट्या शहरातून डॉ यतीन जाधव यांच्यासारख्या लोकाभिमुख व बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपत्ती व्यवस्थापन समिती च्या राज्य चेअरमनपदी नियुक्ती करून जी महत्वपूर्ण संधी दिली आहे ही समस्त चिपळूणकरांसाठीच एक मोठी गौरवाची बाब आहे अशी लोकभावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!