ज्येष्ठ नागरिक संघ चिपळूण तर्फे ज्येष्ठांचे सत्कार
लग्नाला ५० वर्षे झालेल्या ज्येष्ठांचाही सत्कार
चिपळूण जेष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक
11/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता वीर सावरकर सभागृहात वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार समारंभ संघांचे अध्यक्ष उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी मा. संजयजी जाधव उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष उदय वेल्हाळ, सचिव रत्नामाला कलम्बटे आणि कोषाध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते. या कार्यकमास 75 वर्षे पूर्ण झालेल्या 39 सभासदांना तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या 18 दाम्पत्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. सुरवातीला अध्यक्ष उस्मान बांगी यांनी मुख्याधिकारी संजयजी जाधव यांचा शाल श्रीफल व पुष्प देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रस्ताविक करून थोडक्यात कामाजाचा अहवाल सादर केला.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते 75 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन यतोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे संजयजी जाधव यांनी मनोगत व्यक्त करून जेष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले. सत्कारमूर्तिपैकी मधुसूदन केतकर व शंकरराव शेडगे यांनी मनोगत व्यक्त करून या स्तुत्य उपक्रमबद्दल धन्यवाद दिले. या कार्यकमास मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. शेवटी अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यकमाचे सूत्रसंचालन नीला पेंडसे यांनी व आभार रत्नमाला कलम्बटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जाधव, विजय बापट, नंदकुमार तांबे, अ. गणी वनकर, लक्षमण कांबळे, माधवी भागवत व मंजिरी नरवणे यांनी परिश्रम घेतले.




