महाराष्ट्र

राज्याच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार आज सावर्ड्यात

आ.शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थित राहणार

*चिपळूण :* सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव निकम यांची नात व आमदार शेखर निकम यांची कन्या चि. सौ. का. मुक्ता व श्री. रविंद्र शिंदे (रा. ओवळी) यांचे चि. अक्षय यांचा विवाह सोहळा आज शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सावर्डे येथे होत असून यानिमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार सावर्डे येथे येत आहेत तसा दौरा देखील जाहीर झाला आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव निकम व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाली आहे. दरम्यान,आज शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या कन्या चि. सौ. का. मुक्ता यांच्या शुभविवाह निमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा पवार या सावर्डे येथे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच येत असल्याने सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आज शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता हेलिकॉप्टरने सह्याद्री शिक्षण संस्था ग्राउंड हेलिपॅडवर आगमन होईल. नंतर मोटारीने ‘स्मृतिगंध’ गोविंदराव निकम स्मारक सह्याद्री शिक्षण संस्था, तांत्रिक विभाग- वहाळ फाटा सावर्डे येथे विवाह सोहळ्यास उपस्थिती लावतील. नंतर दुपारी २ वाजता सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था ग्राउंड हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!