महाराष्ट्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखा व चिपळूण चा महाराजा तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखा व चिपळूणचा महाराजा तर्फे सालाबाद प्रमाणे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त शाखा वडनाका (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित मोफत हाडांची कॅल्शीयम व घनता (BMD) तपासणी शिबीर घेण्यात आले.
हे शिबीर एकविरा देवी मंदिर, वडनाका, चिपळूण येथे पार पडले. या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. गरजू नागरीक व रुग्णांनी शिबीरात भाग घेतला.

यावेळी उपस्थीत नवनिर्वाचीत नगरसेवक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी नगरसेवक निहार कोवळे म्हणाले की, मी लहानाचा मोठा वडनाक्यातच झालो. इथल्या शाखेची शिवजयंती ही माझ्या जन्मा अगोदरपासून आहे. लहानपणापासूनच शाखेची ओढ आणि मंडळाचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यांचा माझ्या जीवनाच्या घडामोडीवर खूप मोठा परिणाम झाला आणि ह्याच संस्कारात वाढलो. आता हाच वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.

नगरसेविका नसरीन खडस म्हणाल्या, रयतेचा राजा, शिवाजी महाराज यांची आपण जयंती साजरी करत आहोत. मी गेली चाळीस वर्षे आपली शिवजयंती जवळून पाहत आहे. आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येवून आनंदात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करत आहात. शिवाजी महाराजांचे धैर्य, शोर्य, नितिमत्ता आणि निर्णयक्षमता हे गुण आपण आत्मसात करून पुढे जावूया. महाराजांची सर्व धर्मसमभाव ही शिकवण आपण सर्वांनी जोपासूया. मंडळाच्या कोणत्याही सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमास माझे नेहमीच पाठबळ असेल, गुण्यागोविंदाने आपण असे उपक्रम नेहमीच घेत रहा.

नगरसेवक अजय भालेकर म्हनाले की, शिवसेना (उध्दव बाबासाहेब ठाकरे) पक्षाकडून नेहमीच तिथीनुसार कछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यानिमितीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा सामान्य जनतेला फायदा होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखेचे व चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक. तसेच संघटना महत्वाची असून, सातत्य देखील महत्वाचे आहे. हे सातत्य राखण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येता हे कौतुकास्पद आहे. बाळा कदम यांचे मार्गदर्शनाखाली मंड‌ळाचे कार्य उत्तमरित्या चालू आहे. मी जरी नगसेवक झालो असलो तरी ती तुम्हां सर्वसारखाच एक सामान्य शिवसैनिक आहे. मला शिवजयंती निमित्ताने बोलविले आपले सर्वांचे आभार.

नगरसेवक संजय गोताड म्हणाले की, गेली अनेक वर्षे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वडनाका शाखेमार्फत ही शिवजयंती साजरी होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या आयुष्याची सुरवात वडनाका येथूनच झाली आहे. वडनाका हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच बालेकिल्ला आहे. शिवसेनेची ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ही शिकवण आम्ही आत्मसात केली. जयंती, उत्सवा निम्तित्त विविध उपक्रम घेणे, विविध आरोग्य शिबीरे घेणे हा सामाजिक कार्याचाच भाग. अशी शिबीरे मोफत घेवून खऱ्या अर्थाने समाजसेवा होय. एक सामान्य शिवसैनिक एक नगसेवक बनला ही शिवसेनीची ताकत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. महादेव उर्फ ​​बाळा कदम म्हणाले. की, चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष बंड्याशेठ पेडनेकर, संजय रेडीज, बंधू कदम, पिंट्या पवार आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते याचे आभार मानले. वडनाक्यातील शिवजयंती आम्ही लहानपासून पहात आलो आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम साजरे केले जातात. तसेच महाराज मंडळाची टिम ही चिपळूणमध्ये डिझास्टर मॅनेजमेर मध्ये सध्या एक नंबरला आहे. याची दखल खुद्द चिपळूण प्रांत सोहबानी घेतली व कौतुक केले. पूर परिस्थिती असो किंवा कोणत्याही नैसर्गिक अडचणींमध्ये आपल्या मंडळाने नेहमीच मदतीचा हात देन्यात पुढाकार घेतला आहे.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. महादेव उर्फ बाळा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

बंधू कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना चिपळूण शहर अधिकारी श्री पार्थ जागुष्टे यांना देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चिपळूणचा महाराजा अध्यक्ष प्रवीण पेंडणेकर, बंधू कदम, संजय रेडीज, राहुल गुरव, पिंट्या कोवळे, पिंट्या पवार, मंदार शिंदे, बाळा गुरव, पार्थ जागुष्टे, समीर राऊत, किशोर राऊत, निकु रतवा, नारकर साहेब, सिद्धेश गुरव, सुशांत गुरव, राजेश कदम, आयुष कुबडे, प्रणव कदम, आदित्य पेडणेकर, शुभम शिंदे, पियुष गुरव, पार्थ गुरव, चंद्रकांत कोवळे,अथर्व चव्हाण, रतन कोवळे आणि श्री सचिन चोरगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!