महाराष्ट्र

‘त्या’ नाल्यावर बॅरिकेट्स बांधणार : नगरपरिषदेकडून पाहणी व मोजमाप

प्रभागातील नगरसेविका अंजली कदम व बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्या सूचनेवर अंमलबजावणी

चिपळूण – येथील बहादूरशेख नाक्या जवळील राधाकृष्ण नगरच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या नाल्यावर चिपळूण नगर परिषदेतर्फे संरक्षक कठडा व त्यावर बॅरिकेट्स बांधण्यात येणार आहेत.याबाबत या प्रभागातील नगरसेविका अंजली कदम आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी प्रशासनाला सूचना दिल्या व त्यानंतर पाहणी करण्यात आली आहे.

या नाल्याला पुरेसा संरक्षण कठडा व बॅरिकेट्स नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यात दोन अपघात घडलेले आहेत.सध्या महामार्गावर कामे सुरू असल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे हे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे नगरसेविका अंजली कदम यांनी याबाबत अगोदरच चिपळूण नगरपरिषद प्रशासनाला सूचना दिली होती परंतु काही कारणास्तव ते काम पुढे गेले नसल्याने पुन्हा सौ.कदम आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन प्रशासनाचे अभियंता यांना तिथे पाचारण केले. या ठिकाणी अभियंता आणि मोजमाप घेऊन या नाल्यावर सिमेंटचा कठडा आणि त्यावर तीन टप्प्यात असलेला बॅरिकेट्स बांधण्याचा प्रस्ताव तयार करू असे सांगितले आहे. सदरचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे येण्याची शक्यता आहे यामुळे संरक्षक कठडा आणि बॅरिकेट्स तयार होऊन अपघात टळू शकतील. बांधकाम सभापती कपिल शिर्के व अंजली कदम तसेच प्रभागातील नागरिक पूर्वा तांदळे,प्रमोद कदम,शिरीष दांडेकर आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!