महाराष्ट्र
मनसेच्या अविनाश जाधवांवर मीरा-भाईंदर मधील मोर्चा पूर्वी कारवाई
सकाळी साडेतीन वाजताच पोलिसांनी घेतली ताब्यात

- नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजवण्यास सुरुवात केली होती मात्र मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्यापेक्षा मोठी कारवाई केली पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती मात्र अविनाश जाधव मोर्चाला जाण्यावर ठाम होते. जाधव यांनी मराठी बांधवांना या मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते.



