प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम
चिपळूण राष्ट्रवादी तर्फे वृद्धाश्रमातील बांधवांना वस्तू वाटप

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने गाणे कळकवणे येथील लिलाबाई आधार वृद्ध आश्रम येथे आश्रमातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, प्रदेश महिला सरचिटणीस दिशाताई दाभोळकर, विधानसभा अध्यक्ष रमेशजी राणे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते अशोक भाई कदम, खेर्डी गावचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर आदींनी आपापली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश सचिव जयद्रथ खाताते, विधानसभा अध्यक्ष रमेश राणे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते अशोक भाई कदम, तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर, माजी उपसभापती पांडूशेठ माळी, सामाजिक कार्यकर्त्या रेश्माताई भुवड, माजी पंचायत समिती सदस्य प्रियाताई भुवड, राकेश जाधव, युवक कार्याध्यक्ष राजेंद्र सुतार, युवक उपाध्यक्ष राहुल शिंदे, रमेश वरेकर माजी सरपंच शैलेश पवार, कृष्णा सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष विजय गजमल, माजी उपसरपंच हरीश गजमल, प्रसाद सागवेकर, संतोष कोकरे, महेंद्र कुराडे, सचिन ठसाळे, सचिन शिंदे, शिवाजी गोटल, अमेय कोलगे, धवन गुरुजी, सुरेश गुरव आश्रमातील राम देसाई व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.




