तळवली कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
*पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर जि.रत्नागिरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवार दि.10.7.2025 रोजी ‘गुरू पौर्णिमा’ उत्साहात साजरी केली.*
*गुरू पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रारंभी प्राचार्य महावीर थरकार सर यांना प्रा.अमोल जड्याळ सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर इतर सर्व उपस्थित गुरु जनांचे स्वागत केले. कु.शर्वरी शितप हिने स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर आर्यन गुरव, सर्वेश जोशी, जागृती लोंढे, अनिश जोगळे, शिवानी गुरव, रसिका डाकवे, श्रवण कळंबाटे, नयना पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या वाटचालीत गुरूंचा वाटा फार मोलाचा आहे. गुरू शिवाय आपण आयुष्यातील खडतर प्रवास यशस्वी करु शकत नाही,अशी भावना व्यक्त केली.*
*या वेळी प्रा.अमोल जड्याळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्राचार्य महावीर थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,प्रत्येकजण इतर व्यक्तींकडून नवनवीन शिकत असतो. विशिष्ट प्रसंगी आपल्याला कोणाची ना कोणाची तरी मदत होत असते.मार्गदर्शन मिळत असते. अशी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरू असते. केवळ शिक्षकच आपले गुरू नसून आपले माता-पिता आपल्या कुटुंबातील सदस्य, समाजातील इतर घटकसुद्धा आपले गुरू असू शकतात. त्या सर्वांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.*
*या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले होते. यासाठी रसिका डाकवे, शर्वरी शितप, दिक्षा पड्याळ, रिया आंबेकर, आकांक्षा भुवड, वेदिका पाटील, नयना पवार, विवेक लोंढे, दुर्वेस भुवड, राज भुवड व इतर विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या विद्यार्थ्यांना प्रा. जड्याळ सर, प्रा. आयरे मॅडम, प्रा. सावंत मॅडम, प्रा, कांबळे मॅडम, प्रा. जड्याळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी कळंबाटे हिने केले तर कु.दिपेश पोफळे याने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.*




