महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजून अधिकृत राजीनामा दिलेला नाही
युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी केले जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष:शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही तसेच पक्षामार्फत अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी जाहीर केले आहे.
येत्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची *वाय बी चव्हाण* सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी तसेच जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते आजी-माजी आमदार ,खासदार, यांच्या बैठकीमध्ये आदरणीय *शरदचंद्रजी पवार* साहेबांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात येईल असे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.




