हाजी दाऊद अमीन हायस्कूलच्या शेख अब्दुल रज्जाक चे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र

महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) -२०२५ मध्ये हाजी दाऊद अमीन हायस्कूल कालुस्ते तालुका चिपळूण चा हुशार विद्यार्थी शेख अब्दुल रज्जाक अनीस याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त करण्याचा सन्मान मिळवला आहे.उर्दू व इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत त्याने ५९.०६४% गुण प्राप्त केले आहेत.
शेख अब्दुल रज्जाक याचे वडील शेख अनीस व आई दोन्ही कर्तव्यदक्ष व उपक्रमशील शिक्षक असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सोशल एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक शिक्षकेतर वर्ग तसेच अन्य स्थानिक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यावेळी परवाज़ फाउंडेशन सोलापूर चे अध्यक्ष तथा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मद समी मोमीन यांनी शेख अब्दुल रज्जाक याचे अभिनंदन करताना हे यश त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आदर्श असल्याचे म्हटले आहे.



