Uncategorizedमहाराष्ट्र
सती चिंचघरी प्राथमिक शाळेची पालक सभा उत्साहात संपन्न
माजी पं.स. सदस्य नितीन उर्फ अबू ठसाळे यांची प्रमुख उपस्थिती

- चिपळूण : सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता.चिपळूण या विद्यालयाची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची पहिली पालक सभा मोठया उत्साहात संपन्न झाली.
शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. सभेसाठी उपस्थित चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन ठसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेच्या सुरूवातीला T. S. E. व शताब्दि शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. मागील शैक्षणिक वर्षातील पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. सभेसाठी ज्युनिअर के.जी ते ४ थी पर्यंतचे ३५० पालक उपस्थित होते. प्रथम पालकांचे स्वागत करून शाळेत असणारे ई-लर्निंग, सेमी इंग्लिश, संगणक लॅब, ई-बुक गॅलरी, थ्री डी थिएटर, डिजिटल क्लासरूम त्याचप्रमाणे विविध उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली. यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अंतर्गत विद्यार्थ्यांचे वर्षभरात होणारे मूल्यमापन व त्यासाठी असणारा नियोजित पाठयक्रम याची माहिती देण्यात आली व अभ्यासक्रमाच्या वार्षिक नियोजनाची लेखी प्रत पालकांना वितरीत करण्यात आली. पाठ्यपुस्तकात झालेले बदल पालकांच्या निदर्शनास आणण्यात आले. शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्या, गणवेश, विद्यार्थी सुरक्षा, सुधारीत शैक्षणिक धोरण २०२०, पाठयपुस्तक योजना इ. बाबत सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे होत असतात, त्यावेळी शाळेकडून विद्यार्थ्याला भेटकार्ड देणे तसेच एक साबण व पुस्तक स्विकारणे अशा उपक्रमावार चर्चा करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांचे दप्तर, वेळापत्रक याची देखील पालकांना माहिती करून देण्यात आली. पालक सभेसाठी प्राथमिक शाळा व शिशुविहारच्या सर्व कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली.




