शिक्षिका नाझिमा सकवारे यांना हिरकणी पुरस्कार
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेकडून सन्मान

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
– समाजकार्य, साहित्य, कला आणि महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाझीमा कमाल सकवारे यांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गौरवामुळे चिपळूण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
हिरकणी पुरस्कार हा महाराष्ट्रातील महिलांना दिला जाणारा एक अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. ज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वासाठी महिलांचा गौरव करण्यात येतो. नाझीमा सकवारे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून व विचारपूर्वक कृतीतून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार आणि प्रेरणा मोठी आहे. त्यांचे वडील उस्मान बांगी हे सेवानिवृत्त शिक्षण अधीक्षक असून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत.
नाझीमा सकवारे यांनी हा पुरस्कार आपल्या पालकांना आणि समाजाला अर्पण केल्याचे नम्रपणे सांगितले.
नाझीमा कमाल सकवारे यांचे चिपळूण व परिसरातील विविध सामाजिक संघटना, शिक्षकवर्ग, महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




