गाणे (राजवाडा) येथे दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक
सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी दवाखान्यात केले दाखल

प्रतिनिधी-डॉ.सुनील सावंत
दसपटी( चिपळूण) चिपळूण नांदिवसे रस्त्यावरील गाणे (राजवाडा) येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली.आज दुपारी सदरची घटना घडली. ही घटना एवढी भीषण होती की रस्त्याच्या मधोमध रक्ताचा सडा पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण—नांदिवसे रस्त्यावरील गाणे(राजवाडा) येथे दुपारच्या सुमारास संदीप शांताराम जाधव (वय २५ वर्षे) रा. ओवळी व यश सुर्यकांत घडशी (वय २० वर्षे) रा.कळकवणे (घडशीवाडी) या दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली, यांना तातडीने कादवड येथील समाजसेवक श्री.स्वप्निल शिंदे यांनी अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर हाॅस्पिटल येथे दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे असे समजले. दोन्ही गावातील ग्रामस्थांसह अॅड. अमित अशोकराव कदम हे हाॅस्पिटलमध्ये पोचले आहेत, व जातिनिशी लक्ष्य ठेवून आहेत. अपघातग्रस्त कळकवणे येथील यश घडशी हा खडपोली एम्.आय.डी.सी. येथील कंपनीत कार्यरत असल्याचे समजले



