महाराष्ट्र

विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृतीसाठी’सक्षम तू’उपक्रम संपन्न

पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी यांचे मार्गदर्शन

चिपळूण :इंग्लिश मिडियम स्कूल, पाग आणि न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, पाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “सक्षम तू” हा विशेष कायदेविषयक जागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात कै. गोविंदराव निकम आणि कै. अनुराधा निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मीरा महामुनी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, पास्को कायदा, स्वसंरक्षण, तसेच विद्यार्थ्यांवरील कायदेशीर परिणाम यासारख्या गंभीर मुद्द्यांवर अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.
तसेच मोबाईल फोनचा वापर माहिती मिळवण्यासाठी कसा योग्य पद्धतीने करावा, याविषयीही विद्यार्थ्यांना सजग केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात कायद्याबाबतची सजगता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व जिल्हा बँकेच्या संचालक दिशाताई दाभोळकर, शहराध्यक्षा अदिती देशपांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनाली जाधव, तालुका पोलीस कॉन्स्टेबल सुमेधा पांचाळ, मुख्याध्यापक श्री. साळुंखे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधानाची प्रतिमा शाळेला भेट म्हणून देण्यात आली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिशाताई दाभोळकर यांनी केले. सूत्रसंचालन मानसी शिर्के यांनी तर आभार प्रदर्शन सै. पंडित मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदेविषयक सजगतेसाठी आयोजित केलेला “सक्षम तू” हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!