जिजाऊ ब्रिगेड तर्फे आजी माजी सैनिकांना बांधल्या राख्या
जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण व सहकाऱ्यांनी राबविला उपक्रम

- हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आणि रक्षाबंधन चे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेड (चिपळूण ) तर्फे सैनिकी वसतिगृहात माजी सैनिक आणि आजी सैनिकांना राख्या बांधण्यात आल्या
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला हार अर्पण करून जिजाऊ वंदना गित बोलण्यात आली.
त्या नंतर रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष स्नेहल ताई चा सन्मान आजी माजी सैनिक कल्याण समिती चिपळूण अध्यक्ष श्री सुभेदार चंद्रकांत पवार, चिपळूण वसतिगृह अधीक्षक सुभेदार श्री योगेश बने तसेच सैनिक कल्याण कार्यलय रत्नागिरी चे अध्यक्ष सुभेदार सुनील कदम , सुभेदार आत्माराम कदम व प्रफुल रेडिज याच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि शाल देवून सन्मान करण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी यांचा सुद्धा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.त्या नंतर जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण तालुक, अध्यक्ष मीनल गुरव, शहर अध्यक्ष वर्षा खटके, उपशहर अध्यक्ष अपूर्वा गायकवाड ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम चे प्रस्तविक आणि सुरवात सैनिक कार्यलयरत्नागिरी चे सुनिल कदम ,तसेच चिपळूण अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि वसतिगृह चे अधीक्षक बने सर नी आम्हला त्याचा सैनिक वसतिगृहा बद्दल आणि मुलाबद्दल चे माहिती आणि त्याचे उपक्रमा बद्दल माहिती जिजाऊ ब्रिगेड ला दिली.
त्या नंतर सीमेवर लढणाऱ्या आमच्या सर्व माजी आजी सैनिक बंधूना जिजाऊ ब्रिगेड च्या सर्व महिला नी त्यांना ओवाळून राख्या बांधल्या आणि गोड म्हणून पेढे देण्यात आले.
कार्यक्रम खूप छान आनंदात पार पडला
त्यासाठी आम्हाला आजी माजी सैनिक कल्याण समिती चिपळूण चे अध्यक्ष श्री सुभेदार चंद्रकांत पवार यांनी आणि सुभेदार बने सर यांनी आम्हला वेळात वेळ काढून कार्यक्रम चे नियोजन केले त्याचे आभार. रक्षाबंधन कार्यक्रम राखी पौर्णिमा निमित्त मीनल ताई गुरव यांनी रक्षाबंधन वर एक गाणं गायलं तसेच ए मेरे वतन के लोगो हे सैनिक वरील गाणं अपूर्वा गायकवाड यांनी गायलं ह्या दोघीनीच्या गाण्यामुळं एक वेगळाच भावनिक माहोल बनला होतामाजी आणि आजी सैनिक सुभेदार चट्रकांत पवार
अध्यक्ष आजी माजी सैनिक कल्याण
सुभेदार योगेश बने रत्नागिरी जिल्हा अधीक्षक
सुभेदार प्रशांत शिर्के उपाध्यक्ष
सुभेदार सुनील कदम सैनिक कल्याण कार्यलय रत्नागिरी
सुभेदार संतोष कदम
हवालदार शंकर कवडे
हवालदार विलास गमरे
सुरेश मोरे
हवालदार मनोज पालांडे
हवालदार विशाल खेडेकर हवालदार वैभव पालांडे
प्रफुल रेडिज
तसेच जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण
जिल्हा उपाध्यक्ष विभावरी जाधव जिल्हा सचिव पूर्वा तांदळे चिपळूण
तालुका अध्यक्ष मीनल गुरव खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे,शहर अध्यक्ष वर्षां खटके, शहर उप अध्यक्ष अपूर्वा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्यां स्वाती भोजने, तृप्ती कदम, आरती महाडिक. इ महिला आणि आजी माजी सैनिक हजर होतेकार्यक्रम चे आयोजन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल ताई चव्हाण यांनी केले
,




