कामगारांचे अर्धे देयक मिळाल्यानंतर में.सुजाला इंडस्ट्रीज विरोधातील कामगारांचे उपोषण स्थगित
प्रांताधिकारी यांची यशस्वी मध्यस्ती : अबूशेठ ठसाळे यांच्या दीर्घकालीन लढ्याला यश

चिपळूण – तालुक्यातील खेर्डी एम.आय.डी.सी येथील मे.सुजाला इंडस्ट्रीज कंपनीने २८ वर्षापूर्वीचा कामगारांचा १४ महिन्यांचा पगार आणि थकित रक्कम न देता कंपनी परस्पर वॅनगार्ड लॅस्ट प्रा.लि ला विकली.वॅनगार्ड लॅस्ट प्रा.लि कंपनीने महावितरणकडे चुकीचे कागदपत्र देऊन विज मंडळाला अंधारात ठेवून विज कनेक्शन घेतले होते.विज मंडळाला कामगारांनी याबाबत पुरावा सादर करून देखील महावितरणने नव्या कंपनीला विज कनेक्शन दिल्यामुळे देयक बाकी असलेल्या कामगारांनी संतप्त होऊन महावितरण आणि मे.सुजाला इंडस्ट्रीज कंपनीचे मालक यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पासुन पाग येथील विज मंडळाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते.मागिल दोन वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री.नितीन(अबु) ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कामगारांचा सुजाला कंपनीच्या विरोधात लढा सुरु होता.आज रविवार दि.17 ऑगस्ट रोजी उपोषणाचा तिसरा दिवस होता.प्रशासकीय अधिकारी,उपोषण कर्ते व राजकीय पदाधिकारी यांच्यात अखेर यशस्वी चर्चा झाल्यानंतर कंपनीचे संचालक श्री.गजानन कदम यांनी थकित सर्व रक्कमे पैकी अर्ध्या रक्कमेचा धनादेश कामगारांच्या स्वाधीन केला यानंतर रविवारी दुपारी उपोषण स्थगित करण्यात आले.
चिपळूण मधील खेर्डी औद्योगिक वसाहती मधिल मे.सुजाला इंडस्ट्रिज मधील असंख्य कामगारांनी
येथील महावितरण कंपनीच्या
कार्यालया समोर १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू ठेवले होते.पूर्वीची सुजाला इंडस्ट्रीज कंपनी
बंद झाली कंपनीकडून ४२ कामगारांच्या मागील १४ महिन्यांच्या पगारासह काही प्रश्न प्रलंबित
आहेत असे एकूण ४२ कामगारांचे १० लाख २२ हजार ६६५ रुपये कंपनीकडून येणे आहेत.सदर कंपनी बँक ऑफ महाराष्ट्र,शिरगाव शाखेकडे गहाण होती.त्या नंतर सदर कंपनी वॅनगार्ड लॅस्ट प्रा.लि ने 5 लाख रुपये किमतीत बँकेकडून खरेदी केली मात्र जो पर्यंत सुजाला
कंपनी या कामगारांचे प्रश्न सोडवित नाही,तोपर्यंत या नवीन कंपनीचा वीज पुरवठा सुरू करू नये,अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती.तरीही देखील महावितरण कंपनीने
कोणतीही कागदपत्रे न पाहता चुकीच्या पध्दतीने वॅनगार्ड लॅस्ट प्रा.ली या नवीन कंपनीचा वीज पुरवठा सुरू केल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.या कंपनीचे व्यवस्थापक श्री.प्रकाश कदम हे कामगारांच्या वतीने मागील २८ वर्ष लढा देत होते तसेच प्रलंबित असलेल्या या कामगारांच्या लढ्यामध्ये चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.नितीन(अबु) ठसाळे यांनी सुरवातीपासूनच कामगारांच्या बाजूने उभे राहत वेळोवेळी सहकार्य केले होते.सुजालाचे मालक श्री.तेंडुलकर यांनी देखील कामगारांना उत्तम सहकार्य केले.१६ ऑगस्ट रोजी उपोषणाचा
दुसरा दिवस होता.दरम्यान आमदार श्री.भास्कर जाधव,आमदार श्री.शेखर निकम,श्री.नितीन ठसाळे,श्री.दशरथ
दाभोळकर व श्री.उमेश खताते यांनी देखील या उपोषणावर
तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र
जो पर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,या भूमिकेवर हे कामगार ठाम राहिल्याने सतत तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत उपोषण सुरूच होते.उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींनी उपोषणकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत कामगारांचे थकीत पैसे ताबडतोब मिळावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.प्रांताधिकारी श्री.आकाश लिंगाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बेले,पोलिस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे,श्री.नितीन ठसाळे आणि वॅनगार्ड लॅस्ट प्रा.ली चे संचालक श्री.गजानन कदम यांच्यात उपोषण स्थळी महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीमध्ये सर्व अधिकारी वर्गाने एकमुखी श्री.गजानन कदम यांना कामगारांची थकीत रक्कम देण्याबाबत स्पष्ट सूचना केली.प्रांताधिकारी श्री.आकाश लिंगाडे यांनी या विषयात महत्त्वपूर्ण यशस्वी मध्यस्थी केल्या अखेर या कंपनीने नमते घेत रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी एकूण देणी असलेल्या १० लाख २२ हजार ६६५ रुपये रक्कम पैकी श्री.धोंडीराम गंगाराम भुरण या कामगारांच्या नावे २ लाख ५५ हजार ६७५ रुपयांचा दिनांक २१ ऑगस्ट २०२५ चा धनादेश आणि या कंपनीचे माजी व्यवस्थापक श्री.प्रकाश शंकर कदम यांच्या नावे २ लाख ५५ हजार ६७५ चा धनादेश दिला असे एकूण ५ लाख ११ हजार ३५० रुपयांचा धनादेश मे.सुजाला इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक श्री.गजानन कदम यांनी कामगारांच्या स्वाधीन केला.उर्वरित रक्कम गणेशोत्सवा आधी औद्योगिक महामंडळ रिजनल ऑफिस,रत्नागिरी यांच्या दालनात अधिकारी,उपोषणकर्ते व उपोषणाला पाठिंबा देणारे पदाधिकारी यांच्यात बैठक होऊन उर्वरित रक्कम श्री.कदम यांनी देण्याचे ठरल्या नंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.आ.श्री.भास्कर जाधव,आ.श्री.शेखर निकम,श्री.नितीन ठसाळे,श्री.दशरथ दाभोळकर,सौ.दिशा दाभोळकर,श्री.जयंद्रथ खताते,श्री.उमेश खताते,श्री.विनोद भूरण,श्री.सतीश शिंदे,श्री.विनय(बाळा) दाते,श्री.संदेश मोहिते यांचे उपोषणकर्त्यांनी विशेष आभार मानले.



