सह्याद्री समाचार वर्धापन दिनानिमित्त चिपळूणात आज पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन
साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांचा सह्याद्री समाचार कडून गौरव न
चिपळूण -सह्याद्री समाचार वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री समाचार आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रितांचे कवी संमेलन आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सह्याद्री समाचार करून विशेष गौरव केला जाणार असून कवी संमेलनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कवींना काव्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाला मान्यवर म्हणून आमदार शेखर निकम, माजी आमदार विनय नातू व सदानंद चव्हाण, वाशिष्ठी मिल्क प्रकल्पाचे सर्व प्रशांत यादव, मनसेचे गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, उद्योजक चंद्रकांत भोजने, संविधान सन्मान समिती प्रमुख गुलाबराव राजे, नमन लोक कला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर, कोकण कला मंचाचे संस्थापक दिनेश दादा कुडतडकर, चिपळूण मुस्लिम समाज या संस्थेचे कार्याध्यक्ष नाझिमभाई अफवारे, डी वाय एस पी राजेंद्र कुमार राजमाने, पंधरा गाव विभाग माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव पालांडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे, कोकण एक्सप्रेस चे संपादक सतीश कदम, चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अब्दुल रऊफ वांगडे, समाजसेवक यासीन भाई दलवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा लोकमान्य टिळक वाचनालयाचे बाळशास्त्री जांभेकर सभागृह, जुना भैर मंदिर समोर चिपळूण येथे पार पडणार आहे.
१.मोहम्मद हुसेन मुसा (चिपळूण) यांना सह्याद्री साहित्यप्रेमी पुरस्कार २. नागेश पाटील (दैनिक सकाळ चिपळूण) यांना सह्याद्री आदर्श पत्रकार पुरस्कार, ३. दीपक कारकर (मुर्तवडे चिपळूण) यांना सह्याद्री आदर्श पत्रकार पुरस्कार, ४. गोपाळ कारंडे (संगमेश्वर) यांना सह्याद्री गीत रत्न पुरस्कार, ५. युवराज जोशी (रत्नागिरी) यांना सह्याद्री बालगंधर्व पुरस्कार, ६. सतीश जोशी (रत्नागिरी) यांना सह्याद्री लोक कलारत्न पुरस्कार, ७. इब्राहिम वांगडे (चिपळूण) यांना सह्याद्री समाज रत्न पुरस्कार, ८. सौ स्वप्न प्रशांत यादव (चिपळूण) यांना सह्याद्री नारीशक्ती पुरस्कार, ९. डॉक्टर मनीषा वाघमारे (चिपळूण) यांना सह्याद्री नारीशक्ती पुरस्कार, १०. ह. भ .प. निलेश पवार(चिपळूण) यांना सह्याद्री कीर्तनकार पुरस्कार, ११. अल्लाह ईश्वर उर्फ सफर अली इसफ(वैभववाडी) यांना सह्याद्री काव्यसंग्रह पुरस्कार, १२. कुमार चैतन्य अरविंद जोगले (चिपळूण) यांना सह्याद्री बाल कलारत्न पुरस्कार, १३. राजेश गोसावी (लांजा) यांना महेश कुमार स्मृती पुरस्कार व १४. संजय बोरुडे (अहमदनगर) यांना सह्याद्री साहित्य समीक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी, लेखक व सरकारी वकील भालचंद्र सुपेकर भूषवणार आहेत. सौ दिपाली महाडिक (खेड), प्रतीक कळंबटे (नरबे गणपतीपुळे), संदेश सावंत (सावर्डे), सौ माधुरी खांडेकर (चिपळूण), सफर अली इसफ (राजापूर), ओंकार गुरव (गुहागर), दादासाहेब शेख (खेड), जमालुद्दीन बंदरकर (चिपळूण), प्रदीप मोहिते (ओमळी), जयंत चव्हाण (दापोली) कु. सिद्धी चालके (खेड) हे निमंत्रित कवी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर कुमारी समायरा शाहिद खेरटकर हिचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून साहित्य, कला व समाजसेवेच्या या सोहळ्याला उभारी द्यावी असे आवाहन सह्याद्री समाचार चे संपादक , शाहीर तसेच कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष शाहिद खेरटकर यांनी केले आहे.



