महाराष्ट्र भोई समाज वधु-वर परिचय पीडीएफ पुस्तक .. गणेशोत्सव विशेषांकाचे प्रकाशन
कार्यक्रमास समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित

(गोपाल धारपवार यांज कडून)
गणेशोत्सव विशेषांकाचे प्रकाशन समस्त महाराष्ट्र भोई समाज अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच तर्फे दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी निमित्त महाराष्ट्र भोई समाज वधु वर परिचय पीडीएफ पुस्तक चे प्रकाशन पनवेल जिल्हा रायगड येथे आदरणीय श्री,लालसिंग जी गुजर सर बाल व महिला विकास मंत्रालय चे सहसचिव सेवानिवृत्त अधिकारी यांच्या निवासस्थानी हस्ते गणेशोत्सव विशेषांक पुस्तके चे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्याला मुंबई विभागातील जनसंपर्क अधिकारी भाभा अनुसंशोधन केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय श्री सुरेश तायडे साहेब, पीडब्ल्यूडी सेवानिवृत्त अधिकारी देविदास जी मोरे साहेब, बांद्रा मुंबई विभागातील मंच जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ लिपिक पोलीस कमिशनर मुंबई चे श्री,राजू मोरे साहेब आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आयटीआय मुंबई अधिकारी श्री गुलाब पिंगळे साहेब, श्री, उदय संजय गुजर साहेब, जलसंपदा सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय श्री,अभिजित अशोक भोई साहेब , याच्यासह महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी गो.धारपवार, जेष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ मीनाक्षी ला. गुजर, महिला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ गंगाबाई देविदास मोरे यांच्यासह इंजि. कुमार तुषार गो. धारपवार इंजि. कुमार प्रशांत गो. धारपवार श्री प्रवीण देविदास मोरे श्री उज्वल देविदास मोरे यांच्या उपस्थितीत पीडीएफ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.




