खेर्डी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र यादव
मान्यवरांनी केले अभिनंदन

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीय दृष्टीने संवेदनशील असलेल्या *खेर्डी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी* निवृत्त पोलीस उपनिरीक्षक *श्री. हरींचंद्र शांताराम यादव* यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
“जेथं धर्म तेथं विजय”
“न्याय आणि प्रामाणिकपणा हीच खरी माणसाची संपत्ती आहे”
याच तत्वांचा वारसा घेऊन श्री. हरिश्चंद्र यादव यांनी समाजाच्या सेवेसाठी पाऊल टाकले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी या गावामध्ये सनातन वैष्णव वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजातील व्यसनाधीनतेविरुद्ध निःस्वार्थी प्रयत्न करणारे ह. भ. प. दत्तात्रय (दत्तूबुवा) यादव महाराज यांचे नातू व गावाचेच सुपुत्र म्हणून श्री. हरिश्चंद्र यादव यांची निवड अधिकच समाधानकारक ठरते.
यादव कुटुंब हे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर कुटुंब म्हणून सर्वत्र परिचित आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ व ग्रंथवाचन या परंपरा आजच्या आधुनिक काळात लोप पावत असताना हाच दिवा सतत प्रज्वलित ठेवण्याचे पवित्र कार्य यादव कुटुंब सातत्याने करत आहे.
या निवडीबद्दल हरिश्चंद्र यादव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




