
चिपळूण : महाराष्ट्र मध्ये सगळीकडे ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करणे तसेच पूर्ण कर्ज माफी करावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थिती बघता शेतकऱ्यां च्या कुटुंबावर अति भयानक संकट आले आहे. ही परिस्थिती शासनाने वेळीच सावरली नाही तर या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल. आणि शेतकऱ्यां च्या आत्महत्या वाढतील. त्या मुळे पंचनामा आणि इतर बाबीच्या भानगडीत न पडता सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी तसेच पूर्ण कर्जमाफी व्हावी अशी विनंती आम्ही जिजाऊ ब्रिगेड कढून या निवेदन द्वारे शासनाकडे करत आहोत.
कृपया जास्त विलंब न लावता सणासुदीला काळात शेतकऱ्यां च्या घरची चूल कशी पेटेल. त्याचा मुलाच्या शिक्षणाच्या खर्च कसा भागेल याचा गंभीर्याने विचार शासनाने करावा ही कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन माननीय नायब तहसीलदार मोरे साहेब याच्या मार्फत शासनाला देण्यात आले.
निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, चिपळूण तालुका अध्यक्ष मीनल गुरव खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे. सदस्य दिलबर खान उपस्थित होते.




