चिपळूण तालुक्यातील शिरळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते हाजी शौकत हुसेन म्हातारनाईक यांची ग्रामसभेने बिनविरोध निवड केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरळ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शशिकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी तंटामुक्ती समिती निवडण्यात आली. हाजी शौकत हुसेन म्हातारनाईक यांची अध्यक्षपदी तर सदस्यपदी सरपंच शशिकांत राऊत, माजी उपसरपंच फय्याज शिरळकर, उपसरपंच शमीना चिपळूणकर, तंटा मुक्ती माजी अध्यक्ष मुदसर चौघुले, सुलताना अश्रफ चौघुले, जोहरा चिवेलकर, संजना भुवड, गुलजार कुरवले, सदानंद फाके, अशोक भुवड, हिशामुद्दीन म्हातारनाईक, अकबर कुरवले, अश्रफ चौघुले, अकबर चौघुले, अली कुरवले, ताहिर दिवेकर, प्रवीण जाधव, आनंद कदम, मुराद अनवरे, बावा मोरे, पोलीस पाटील दिलावर खडपोळकर, ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया कदम, विलास मोरे, जमाल कुरवले, विनायक भुवड, प्रभाकर मोहिते आदिची निवड झाली. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




